चाकरमानी महिलांसाठी खुषखबर ! लोकलने प्रवास करता येणार

परंतु ठराविक कालावधीतच, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई : मागील सात महिन्यापासून राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच मुंबई उपनगरात लोकलने प्रवास करता येत होता. मात्र आता या परवानगी असलेल्यांबरोबरच सर्वसाधारण महिला चाकरमानींनाही उद्यापासून अर्थात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून लोकलने प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी त्या कालावधीतच प्रवास करता येणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर रात्रो लोकल सेवा बंद होईपर्यत सर्वसाधारण महिलांना प्रवास करता येणार आहे. इतर कालावधीत राज्य सरकारने निर्धारीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे लोकलने प्रवास करण्याची परवानगी कायम राहणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.

 474 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.