शिवनेरी मंडळाच्या कबड्डी खेळाडूंच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंच्या मुलाखती फेसबुक व यु-ट्युबच्या माध्यमातून कबड्डीप्रेमीपर्यंत पोहचवून या स्पर्धेतील जुन्या आठवणीना देणार उजाळा


  मुंबई :   शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने गेली ५०वर्ष सातत्याने होणारी कबड्डी स्पर्धा यावर्षी कोरोना विषाणू संसर्गजन्य विकाराच्या महाभयंकर विकारामुळे रद्द करण्यात आली आहे.  कोरोनामुळे जरी यंदा ही स्पर्धा होऊ शकत नाही तरी ती उणीव एका वेगळ्या पद्धतीने भरून काढण्याचा मानस या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानिमित्ताने १७ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंच्या ऑन-लाईन मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखती भारतीय रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू राणाप्रताप तिवारी घेणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंच्या मुलाखती फेसबुक व यु-ट्युबच्या माध्यमातून कबड्डीप्रेमीपर्यंत पोहचवून या स्पर्धेतील जुन्या आठवणीना उजाळा देण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात येईल. त्याचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या पत्रकाद्वारे प्रकाश भोसले (९६६४८७५०५१) व किरण मोरजकर यांनी संयुक्तरित्या प्रसार माध्यमाकरिता तो दिली आहे.
मुलाखतींचे वेळापत्रक             

१७ ऑक्टोंबर – रिशांक देवडीगा आणि  सुवर्णा बारट्टके
१८ ऑक्टोंबर – जया शेट्टी, छाया शेट्टी, गौरव शेट्टी
१९ ऑक्टोंबर – तारक राऊळ, विजया शेलार आणि ललिता भोसले
२० ऑक्टोंबर – सागर बांदेकर, छाया देसाई, भारती विधाते
२१ ऑक्टोंबर – सदानंद शेट्टे, माया आक्रे -मेहेर, आशा गायकवाड
२२ ऑक्टोंबर – भार्गव कदम, चित्रा नाबर आणि  सुनिता देवधरकर               
२३ ऑक्टोंबर – रवी करमरकर, मिनानाथ धनाजी आणि सोनाली शिंगटे
२४ ऑक्टोंबर – सचिन म्हसकर, रवींद्र  करमरकर आणि मेघाली म्हसकर

 355 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.