भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करा

नगसेवक विकास रेपाळे यांचा आंदोलनाचा इशारा

ठाणे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतात त्या भागात म्हणजे प्रभाग क्र.१९ मधील कशिशपार्क, मेंटल हॉस्पिटल परिसर, तीन हात नाका, रहेजा, रघुनाथ नगर, रायलादेवी परिसर, हजुरी, एल.आय.सी. रोड, ग्रीन रोड, लुईसवाडी आणि इतर ठिकाणच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत असुन संपुर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहेच ,याशिवाय परिसरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याने व चाव्याने त्रासलेली असुन याबाबत नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत. या संदर्भात पालिका आरोग्य अधिकाऱ्यांना रेपाळे यांनी कळविले असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने रेपाळे येत्या काही दिवसात आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करणार आहेत.
या संदर्भात त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला आहे. गेले काही महिने रेपाळे वारंवार पत्र व्यवहाराच्या माध्यमातून परिसरातील भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यास सांगत आहेत. महापालिका आयुक्तांनी देखील या संदर्भात पशु वैद्यकीय अधिकारी शमा शिरोडकर यांना या संदर्भात विशेष अभियान राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र पालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या प्रकरणी वारंवार फोनवरुन सुचना देऊन, लेखी विनंती करून देखील जाणीवपूर्वक आरोग्य अधिकारी विनंतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रेपाळे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या ७ दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

 351 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.