कोविड सर्वेक्षणात किन्हवली आरोग्य केंद्र अव्वल

किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील २० गावे व ३८ पाड्यांत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी केली आहे.यात ऑक्सिजन लेव्हल,ताप किंवा मधुमेह,रक्तदाब,दमा किंवा इतर गंभीर आजार असलेल्या रूग्णांची चौकशी करून सर्वेक्षण केले आहे.

शहापूर : किन्हवली परिसरात उद्भवणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमेत घरोघरी जाऊन शंभर टक्के सर्वेक्षण झाले असून या बाबत वरिष्ठांनी कौतुक केले आहे.
कोविड१९ च्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमेत शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील २० गावे व ३८ पाड्यांत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी केली आहे.यात ऑक्सिजन लेव्हल,ताप किंवा मधुमेह,रक्तदाब,दमा किंवा इतर गंभीर आजार असलेल्या रूग्णांची चौकशी करून सर्वेक्षण केले आहे.
किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी,आशा स्वंयसेविका यांनी एकूण २५हजार ४१८ लोकसंख्या असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहचून सर्वेक्षण केले आहे व त्याची ऑनलाईन माहिती भरण्याचे महत्त्वाचे काम जवळ जवळ शंभर टक्के पूर्ण केले आहे.या साठी त्यांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.तरुलता धानके यांचे मार्गदर्शन मिळाले असून स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पवार यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
ठाणे जिल्ह्यातील एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वेक्षण कामकाजाच्या टक्केवारी पेक्षा या आरोग्य केंद्राचे काम अव्वल ठरले आहे.
आरोग्यसेवक ए. एस. तिवरे, आर. व्हि. नांगरे, एच. के. हरड,पि. सी. करण, योगेश धानके,व आरोग्य सेविका
सुरेखा माढा,वंदना पाटिल,ए.डी. देसले, एम.डी.कनकोशे,आर.एस. मुखमाले,
ए. आर. कासार व सर्व आशा सेविका यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष रेंघे,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश नगरे,डॉ.अंजली चौधरी आदी
वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

 539 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.