दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील व्यावसायिक गाळ्यांना ठोकले टाळे

भाडे न भरल्यामुळे स्थावर मालमत्ता विभागाने केली कारवाई

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील भाडेतत्वावरील व्यावसायिक गाळे भाडे न भरल्यामुळे आज स्थावर मालमत्ता विभागाच्यावतीने सील करून ताब्यात घेण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील व्यावसायिक गाळे भाडे तत्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांचे भाडे मोठ्या प्रमाणात थकले असुन महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने त्याबाबत वेळोवेळी नोटीस देवून देखील भाडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज सर्व गाळे सील करून ताब्यात घेण्यात आले आहेत.
यामध्ये मधुकर मुळूक यांची रु .६ , ९ ४,५७७, मधुकर मुळूक रु .८,१०,७७ ९, प्रमोद इंगळे रु .४,३७,३ ९ ३, मनोहर इंगळे रु .३ , ९ ७,१५४, प्रकाश दळवी रु ३,८ ९ , ४६८, हरियाली पुनव सिंघवी रु .१,८७,३७१, तर कुणाल बागुल यांची रु .५,२१,४६१ इतकी थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांचे गाळे आज सील करण्यात आले आहेत.
हि कार्यवाही ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आदेशानुसार करण्यात आली आहे. स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्त अश्विन वाघमळे, कार्यालयीन अधिक्षक महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जीतेश सोलंकी, प्रविण वीर, तुषार जाधव,भुषण कोळी यांनी पोलिस बंदोबस्तात केली.
दरम्यान सदरचे गाळे महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असुन उर्वरीत गाळ्यांची मुदत संपली आहे. ते सर्व गाळे ताब्यात घेऊन शासन निर्देशनुसार ई- निविदा पद्धतीने देण्यात येणार आहेत.

 340 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.