शेतकरी विघेयक व कामगार सुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेसची सह्यांची मोहीम

३०ऑक्टोबर पर्यत सह्याची हि मोहिम प्रत्येक प्रभागातील प्रमुख हमरस्यावर राबविण्यात येणार आहे.

ठाणे : ३० ऑक्टोबरपर्यत ठाण्यातून ५ लाख नागरिकांपर्यंत पोहचून सह्या जमा करण्यात येणार असल्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात शेतकरी विघेयक व कामगार सुरक्षा विषयी घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबविण्यात येणार असल्याचे शहर काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सांगितले.
अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २ऑक्टोबर “राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती दिनी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विघेयक व काॅग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कामगारांना सुरक्षा देण्याकामी घेतलेले निर्णय बदलण्याची तयारी चालु केली असून ३०ऑक्टोबर पर्यत हि सह्याची मोहिम प्रत्येक प्रभागातील प्रमुख हमरस्यावर राबविण्यात येणार आहे.ठाण्यातील स्टेशन रोड,तहसीलदार कार्यालयाबाहेर आज याबाबत सह्याची मोहीम राबवण्यात आली याप्रसंगी बोलताना सचिन शिंदे यांनी सांगितले की या दोन्ही विधेयकामुळे किसान व कामगार हे देशोधडीला लागणार असून या निर्णयाविरोधात नागरिकांच्या “सह्याची मोहीम” ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रत्येक प्रभागात राबविण्यात असताना ठाण्यात प्रत्येक ब्लाॅकप्रमाणे ठाणे महानगरपालिका हद्दीत एकून १४५ ठीकाणी ही सह्याची मोहीम राबवण्यात येत असून ३० ऑक्टोबर पर्यत किमान ५ लाख नागरिकांपर्यंत पोहचून सह्याचे संकलन करण्यात येणार असल्याचे या प्रसंगी सचिन शिंदे यांनी सांगितले या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नागरिक स्वयंपूर्ण उत्साहाने सहभागी होत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.याप्रसंगी शहर काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष संदिप शिंदे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष धर्मवीर मेहरोल,जावेद शेख्,अक्रम बन्नेखान,भारती जाधव, जानबा पाटील,दिलीप भोईर, चंद्रकांत मोहिते,अॅड हिदायत मुकादम,प्रविण खैरालिया,अंकुश चिंडालिया,आतिष राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 569 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.