नव्या कृषी विधेयकांबाबत
अनिल बोंडे यांचा ठाण्यात संवाद
ठाणे : नव्या कृषी विधेयकांबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविला जात आहे, असे राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज ठाण्यात स्पष्ट केले. या विधेयकांमुळे कृषी क्षेत्रात निश्चितच क्रांती येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपाच्या वतीने खोपट येथील कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. अनिल बोंडे यांनी संवाद साधला. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदिप लेले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ठाण्यातील घाऊक व्यापारी, कृषी क्षेत्राशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी, कडधान्यांचे व्यापारी आदींचीही उपस्थिती होती.
देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हे सर्वात मोठे पाऊल उचलण्यात आले. त्यात शेतकऱ्याला विक्रीचे अनेक मार्ग खुले होणार आहे. सध्याची बाजार समितीची व्यवस्था राहणारच असून, व्यापाऱ्यांना थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधता येईल. त्यातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे डॉ. अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले. नव्या कृषी विधेयकाबाबत विविध प्रश्नांवरही डॉ. बोंडे यांनी उत्तरे दिली.
748 total views, 3 views today