शहापुरात भाजपाचे महाआघाडी सरकार विरोधात निषेध आंदोलन

शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारी महाविकास आघाडी अकारण कांगावा व अपप्रचार करून राजकारण करीत असल्याचा केला आरोप

शहापूर ( शामकांत पतंगराव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषिविषयक विधेयक मंजूर करुन शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणारे पाऊल उचलले आहे. मात्र शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारी महाविकास आघाडी अकारण कांगावा व अपप्रचार करून राजकारण करीत असल्याचा आरोप करत शहापूर भाजपाने आज तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषिविषयक विधेयक मंजूर करुन शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणारे पाऊल उचलले असून महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार त्याचा अपप्रचार करून राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपाने आज सकाळी शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या मतांचा अधिकार काढुन शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश जारी केला आहे. असा आरोप करत शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपाने जाहीर निषेध केला.
यावेळी आंदोलनात भाजपाचे तालुकाअध्यक्ष भास्कर जाधव , शहापुर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ भाकरे,जेष्ठ नेते अशोक इरणक ,तालुका नेते रविंद्र चंदे,राम जागरे,तुकाराम भाकरे, कमलाकर घरात, प्रशांत फुले, सुरेखा इरणक,शहर तसेच शहापुर शहर पदाधिकारी शिवाजी लिहे,राहुल पोवळे,किशोर अग्रवाल,जयवंत जोशी,योगेश काबाडी,राजेश दहिलकर,योगेश चौधरी,संदीप गोरले,सचिन केणे,महेंद्र भांगरे,तुषार शहा,दर्शना गोतरणे आदी सहभागी झाले होते.

 630 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.