आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी
कल्याण : उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने कल्याण मधील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. हाथरस येथील अत्याचाराबद्दल तिव्र निषेध व्यक्तकरीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व पिडीत मुलीच्या कुटूंबाला न्याय मिळावा याकरीता आंदोलन करण्यात आले. संपूर्ण भारतात आज एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यात हाथरस मध्ये जो अन्याय अत्याचार झाला त्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.
595 total views, 1 views today