माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत कोरोना पासून बचाव कसा करावा या आशयाच्या लोकशिक्षण, प्रबोधनात्मक संदेशाने गावात रंगत आहेत भिंती
ठाणे : गावागावात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित व्हावा यासाठी लोकांशी संवाद साधणे, त्यांना शिक्षण देणे आणि माहिती प्रसारित करून जागृकता वाढविणे महत्वाचे आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी गावातील मुख्य भागी मोकळ्या असणाऱ्या भिंतींवर लक्षवेधक, लोकशिक्षण, प्रबोधन होईल असा संदेश, एखादे घोषवाक्य, किंवा चित्र रंगवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ग्रामपंचायत स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने गावातील भिंत्ती बोलक्या वाटू लागल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या मोहीमेची अंमलबजावणी होत असून कोरोना पासून कसा बचाव करावा याबाबत नागरिकांमध्ये सतर्कता, जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायत क्षेत्रात मोकळ्या असणाऱ्या भिंतीवर लक्षवेधक घोषवाक्य, संदेश, ,भित्तीचित्र स्थानिकांच्या सहकार्याने रंगवले जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. आरोग्य विभागाचे आरोग्य पथक घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करत आहे. कोरोनापासून कसा बचाव कसा करावा याचे शिक्षण या पथकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. गावात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी करणे आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कसा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. याची माहिती नागरिकांना दिली जात असून त्यासाठी असा प्रकारे प्रचार प्रसिद्धी करून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे.
594 total views, 1 views today