मुंबई महापालिका,राज्य शासन, सामाजिक न्याय मंत्रालय , पोलीस ,रेल्वे , महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सदस्य होणार सहभागी
मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त दरवर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमी येथे लाखो अनुयायांची गर्दी महामानवाला अभिवादन करण्यास होत असते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने त्या पार्श्वभूमीवर यंदा ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी कोणती कशी खबरदारी घ्यावी याबाबत चा विचारविनिमय करण्यासाठी मुंबई महापालिका; राज्य शासन; सामाजिक न्याय मंत्रालय ; पोलीस ; रेल्वे ;महापरिनिर्वाण समन्वय समिती आदी सर्व संबंधितांची महत्वपूर्ण बैठक उद्या बुधवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चैत्यभूमी स्तूप जीर्ण झाला असल्याबाबत चैत्यभूमी स्तूपाच्या पुनर्विकासाचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव आणि इंदुमिल मधील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक कामाचा आढावा या बैठकीत रामदास आठवले घेणार आहेत.
526 total views, 2 views today