हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे कल्याण पूर्वेत धरणे आंदोलन

उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी  

कल्याण : उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये झालेल्या युवतीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वतील कोळसेवाडी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालया समोर रस्त्यावरच धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वसामान्य नागरीकांनीही सहभाग नोंदवून उत्तर प्रदेश शासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त करत पिडीत युवतीच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत देऊन युपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.
पिडीत तरुणीच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहत शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जे आरोपी पकडले गेले आहेत त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होउन या नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकवले पाहिजे. तरच संपुर्ण देशात आज जो आगडोंब उसळला आहे तो शांत होईल. मुख्यमंत्री योगी आदीत्य नाथ यांनी या निंदनीय कृत्याची नैतीक जबाबदारी स्विकारून राजिनामा द्यावा अन्यथा हे सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच पिडीत कुटुंबियांना भविष्यात सर्वतोपरी संरक्षण देण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली.   
या धरणे आंदोलनात कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्कप्रमुख शरद पाटील, परिवहन सभापती मनोज चौधरी, नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, नगरसेविका सुशीला माळी, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, शरद पावशे, शिवसेनेचे आशा रसाळ, प्रशांत बोटे, प्रभाकर म्हात्रे आदी पदाधिकारी, शिवसैनिक, महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 478 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.