कल्याणात सर्पमित्राने कोब्रासह धामणीला दिले जीवदान

धामण ही बीन विषारी प्रजातीचा साप असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे सांगत दत्ता बोंबे यांनी  जनजागृती  केली

कल्याण : कल्याणात शनिवारी सर्पमित्राने एक कोब्रा नाग, तसेच एका धामणीला पकडून जीवदान दिले आहे. कल्याण पश्चिमेतील कल्याण खाडी तीरा जवळील कोनगाव येथील  डी. के. होम्स् कंपाऊंड परिसरातील इमारतीच्या जिनाच्या कोपऱ्यात कोब्रा जातीचा विषारी नाग बारा वाजण्याच्या सुमारास समीर इनामदार यांना आढळल्याने तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल करून बोलविले. घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सुमारे सहा फुट लांबीच्या विषारी कोब्रा जातीच्या नागाला पकडल्याने उपस्थित इमारतीतील रहिवाशांचा जीव भांड्यात पडला.                       

   दरम्यान कल्याण रेल्वे ट्रेक आँफिस मध्ये सकाळी दहाच्या सुमारास साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची भितीने धादंल उडाली. रविंद्र माहडिक यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल करून बोलविले असता घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत आँफिस मधील आडोशाला बसलेल्या ८ फुटी धामणीला पकडल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी सुटेकेचा निश्वास टाकला. याप्रसंगी धामणही बीन विषारी प्रजातीचा साप असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे सांगत दत्ता बोंबे यांनी  जनजागृती  केली.  “पकडलेल्या कोब्रा नाग, धामण यांना वन विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले.

 305 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.