माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत ‘पिंक आर्मी’ मैदानात

आरोग्य सर्वेक्षणात अंगणवाडी सेविकांचा उस्फुर्त सहभाग

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत घरोघरी आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे.यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या १५८५ अंगणवाडी सेविका अर्थात पिंक आर्मी  उस्फुर्तपणे सहभागी होत कोव्हिडं नियंत्रणासाठी हातभार लावत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यच्या ग्रामीण भागात राबवली जात आहे. यासाठी अंगणवाडी सेविका या  रोज ५० कुटुंब आरोग्य सेविकांच्या साहाय्याने भेटी देणे, थर्मल टेम्परेचर व ऑक्सिजन लेव्हल चेक करणे,सर्व्हे झालेल्या कुटुंबांची नावे व वयोगट नोंदी घेणे, सर्वांना आरोग्या विषयी मार्गदर्शन करणे आदी कामांमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत नित्याची कामे सांभाळत या मोहिमेत त्या सहभागी झाल्या आहेत. 
अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व कुटुंबांचा सर्व्हे करून त्यांची माहिती कॅस मध्ये नोंदविणे,  Icds च्या सहा सेवा लाभार्थ्यांना देणे,  ० ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालकांची वजन व उंची पडताळणी करणे,  THR वाटप करणे व नोंदी ठेवणे, CBE कार्यक्रम राबविणे, VHSND कार्यक्रमास लाभार्थी उपस्थित ठेवून आहार व आरोग्य शिक्षण देणे, सॅम बालकांना होम vcdc मार्गदर्शन करणे व नोंदी ठेवणे, अमृत आहार योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देऊन नोंदी ठेवणे, आरोग्य तपासणी साठी सर्व लाभार्थी उपस्थित ठेवणे आदी कामे त्या नित्याने करत असतात. शासनाच्या प्रत्येक उपक्रमात त्या उस्फुर्तपणे सहभागी होत असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) संतोष भोसले सांगतात.

 612 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.