आरोग्य व बांधकाम सभापती कुंदन पाटील यांनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या भेटी

आशा स्वयंसेविकाना केले अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप

ठाणे : प्राथमिक आरोग्य केंद्र अघई, तालुका शहापूर येथे ३० सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती कुंदन पाटील यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपाययोजना म्हणून अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप आशा स्वयंसेविका यांना केले. यावेळी त्यांनी शहापूरच्या अघई, टेंबा , कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद महिला व बालविकास सभापती तारमळे मॅडम, सदस्य राजेंद्र विशे, विठ्ठल भगत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, पंचायत समिती शहापूरच्या सभापती रेश्मा मेमाने , उपसभापती पष्टे इतर पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र अघईचे वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

 361 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.