हजारो रुग्णांना फळे वाटप करून अखंड सेवा सुरू
ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ठाण्यात एकीकडे शिवसैनिकांकडून यज्ञ तसेच होमहवन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल असल्याने कोरोना रुग्णांना हाल होऊ नये तसेच ठाणे कोरणामुक्त व्हावे यासाठी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना बाधित रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. कोरोन्टाईन सेंटर,ग्लोबल रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल तसेच मुंब्रा येथील कोविड रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा वेळेवेळी रुग्णांची विचारपूस एकनाथ शिंदे करीत असून रुगांना काही कमी पडू देऊ नका अश्या सूचना यावेळी शिंदे यांनी कार्यकर्तना दिल्या असल्याचे यावेळी राम रेपाळे यांनी सांगितले.
माझी प्रकृती जशी ठीक होत आहे,तशी आपल्या ठाण्यातील कोरोना बाधित नागरिकांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या हेतून फळ वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. तसेच ठाणे कोरोनामुक्त व्हावे यासाठी एकनाथ शिंदे प्रचंड मेहनत घेत असून सद्या कोरोना बाधित असल्याने सच्चे शिवसैनिक म्हणून आम्ही गोरगरीब नागरिकांना फळे वाटून जनतेच्या आशीर्वाद शिंदे यांच्यावर असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे लवकरत लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील अशी आशा यावेळी राम रेपाळे यांनी व्यक्त केले. समाजसेवा, जनसेवा करीत असताना एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असून यांना लवकरात लवकर आराम पडावा तसेच त्यांची प्रकृती उत्तम व्हावी यासाठी ठाण्यात अनेक धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहेत. शिंदे यांनी कोरोनाच्या काळात अनेक गरजू लोकांना मदत केली आता एकनाथ शिंदे कोरोना पॉसिटीव्ह असताना गरजूना ही मदत मिळण्यापासून वंचित राहू नये व एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आरोग्यासाठी विविध ठिकाणी गरजू नागरिकांना व रुग्णांना राम रेपाळे यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नरेश मणेरा नगरसेवक रमाकांत मढवी , मधुकर पावशे , गुरूमुख सिग , यासीन कुरेशी, संतोष वडवले , संजय भोईर, भुषण भोईर, दिपक वेतकर , सुधीर कोकाटे परिवहन समिती सदस्य बालाजी काकडे , प्रकाश कोटवानी उपायुक्त अशोक बुरपुले मनिष जोशी माजी नगरसेवक प्रदीप खाडे .शशीकांत जाधव संदीप शेलार विजय यादव अन्वर कच्छी अनिस कुरेशी विजय गोरे ऊद्योजक संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
527 total views, 1 views today