माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मैदानात

कल्याण तालुक्यातील गोवेली उपकेंद्राला दिली भेट, सर्वेक्षण पथकाशी साधला संवाद

ठाणे  : करोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु आहे. या मोहिमेची ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यशस्वी अमंलबजावणी होण्याकरीता आज ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रभारी ) डॉ. रुपाली सातपुते यांनी कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव अंतर्गत उपकेंद्र गोवेली क्षेत्रात संयुक्त दौरा केला. दरम्यान घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या पथकाचे प्रत्येक्ष काम पाहत समाधान व्यक्त केले.
यावेळी लोणे आणि डॉ. सातपुते यांनी पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मोहिम यशस्वीकरण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी ठेवण्याची सूचना केली. सर्वेक्षण करताना स्वतःची काळजी घ्या, तोंडाला मास्क लावा, सोबत सॅनिटायझर ठेवा,असेही त्यांनी सांगितले. मोहिमेची कार्यपद्धती कसा प्रकारे राबवली पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे, कल्याण पंचायत समिती गट विकास अधिकारी  श्वेता पालवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड, गावचे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदी  उपस्थित होते.
या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत असून पहिल्या टप्प्यासाठी  आरोग्य विभागातर्गत ६३२ सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले आहेत.  हे पथक घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश संशयित कोव्हिडं तपासणी, व  उपचार, अति जोखमीचें व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोव्हिडं १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, रुग्णांचे गृहभेटीद्वारे संरक्षण, कोव्हिडं तपासणी आणि उपचार, आरोग्य शिक्षण असून या उद्देशांची अंमलबजावणी पथकामार्फत केली जात आहे.

 470 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.