धनगर समाजाचा आरक्षणासाठी ठाण्यात एल्गार

केंद्राने दिलेला निधी सर्वसामान्यांच्या पर्यन्त पोहचलाच नाही – खासदार विकास महात्मे

ठाणे : राज्यात दोन कोटी लोकसंख्या असणारा घनगर समाज गेली अनेक वर्षांपासून मागासलेला असून राज्य सरकार धनगरांच्या मागण्या कडे दुर्लक्ष करीत आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जी तत्परता राज्य सरकार दाखवते तेवढी तत्परता धनगर समाजाच्या आरक्षण बाबत का दाखवीत नाही असा सवाल खासदार विकास महात्मे यांनी ठाण्यात विचारला आहे.या धनगर समाजाच्या आरक्षण मागणी साठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी खासदार महात्मे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणा बाबत तातडीने कारवाही केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा खासदार महात्मे यांनी दिला आंदोलना दरम्यान खासदार म्हणते यांनी राज्य शासनावर तोफ डागली व राज्य सरकार च्या कामकाजावर विविध प्रश्न उपस्थित केले.धनगर समाजाच्या आरक्षण मिळावे म्हणून आमदार निरंजन डावखरे ,आमदार संजय केळकर, माजी आमदार नरेंद्र पवार भटक्या विमुक्त जमातीचे नेते संतोष आव्हाड,डॉ सुनीता महात्मे,निहारिका खोदले,मनीषा सताले,अशोक शेळके यांनी सदर आंदोलनास उपस्थित राहुन पाठिंबा दिला.ठाण्यात झालेल्या धनगर आरक्षण आंदोलनात जिल्ह्यातील मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.कोरोना संसर्गजन्य परिस्थिती आंदोलन शिस्तबद्ध करण्यांत आले.दरम्यान अप्रोह संघटना ठाणे समिती चे ज्ञानदेव निखारे कलसुखरे व इतर कार्यकर्त्यांनी खासदार विकास महात्मे यांना आपल्या समाज्या वर होणाऱ्या अत्याचारा दखल घेऊन न्याय मिळाला या साठी निवेदन देण्यात आले

 436 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.