सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाची बाधा झाल्याची ट्विटरून दिली माहिती
ठाणे : मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री राज्यमंत्री कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता शिवसेनेचे सर्वाधिक कार्यक्षम म्हणून लौकिक असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी आज स्वत: ट्विटरवरून दिली.
आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, डॉ.जितेंन्द्र आव्हाड, हसन मुश्रीफ, डॉ.नितीन राऊत, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे आदी कोरोनाबाधित झाले. यातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे हे त्यातून बरे झाले. तर इतरजण कोरोनावर उपचार करून घेत आहेत. मात्र आज एकनाथ शिंदे यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन करत सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री शिंदे यांनी केली.
501 total views, 1 views today