नवी मुंबई पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार

ऑनलाइन शिक्षणाची सोयही होणार

वाशीचे पालिका रुग्णालय झाले कोरोनामुक्त

आमदार गणेश नाईक यांच्या मागण्या मान्य

नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी मागील तीन महिने महापालिका आयुक्तांबरोबर प्रत्येक आठवड्याला आढावा बैठका आमदार गणेश नाईक घेतं आहेत. ह्या बैठकांची फलनिष्पत्ती म्हणजे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी पालिका प्रशासनाकडून मान्य करून घेतले आहेत. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली ती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्य केली खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये महापालिका शाळा मागे पडू नयेत यासाठी या शाळांमधून ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी देखील त्यांनी मंजूर करून घेतली. नाईक दीर्घकाळ करीत असलेली वाशीचे पालिका रुग्णालय कोरोना मुक्त करण्याची आणखी एक मागणी पूर्णत्वास गेली असून सोमवारपासून हे रुग्णालय सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी खुले करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची सूचना नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली होती त्यानुसार ४३५ पर्यंत ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची योजना पालिकेने आखली असून सध्या डी वाय पाटील रुग्णालयात उपलब्ध ८० व्हेंटिलेटरची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे. उपचाराची यंत्रणा उभी करून केवळ भागणार नाही तर ही यंत्रणा राबविणारे तज्ञ मनुष्यबळ नेमावे लागणार आहे ज्या राज्यांनी कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवले आहे त्या राज्यातील तज्ञांची मदत महापालिकेने घ्यावी त्याकरता राज्याच्या आरोग्य सचिवांमार्फत त्या राज्यांना यासाठी संपर्क करावा अशी सूचना देखील नाईक यांनी आयुक्त बांगर यांना केली. आरोग्य नंतर शिक्षण ही महत्वाची बाब आहे महापालिका शाळांमधून ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता दिसून येत असल्याचा मुद्दा माजी आमदार संदीप नाईक यांनी या बैठकीत विस्तृतपणे मांडला खाजगी शाळांमध्ये युनिट टेस्ट पर्यंत ऑनलाईन शिक्षण पूर्ण झाले आहे मात्र महापालिकेच्या शाळा त्यादृष्टीने मागे पडल्या आहेत त्यामुळे आवश्यक ॲपची निर्मिती करून त्यादृष्टीने शिक्षकांनाही प्रशिक्षण द्यावे असे त्यांनी नमूद केले
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे त्यामुळे कोणतेही कारण न सांगता ही जबाबदारी महापालिकेने पार पाडली पाहिजे असे नाईक यांनी स्पष्ट केले. एपीएमसी बाजार आवारातील कोरोना चा संभाव्य उद्रेक पहाता सर्वप्रथम नाईक यांनी इशारा देऊन एपीएमसीमध्ये लॉकडाउन घेण्याची सूचना केली होती त्यानुसार लॉकडाउन घेतल्यानंतर बाजार आवारातील बाधितांची संख्या कमी झाली होती
मात्र पुन्हा एकदा बाजारामध्ये रुग्णसंख्या वाढण्याचा धोका असून त्यादृष्टीने आयुक्तांनी एपीएमसी सचिवां बरोबर बोलून प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा सल्ला त्यांनी बैठकीत दिला. कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे केंद्र सरकारने नागरिकांना आर्थिकदृष्ट्या उभे करण्यासाठी आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ नवी मुंबई पालिका क्षेत्रातील नागरिकांना करून देण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी करावी अशी सूचना केली. जम्बो कोरोना सेंटर उभे करून आणि उपकरणे उपलब्ध करून काम भागणार नाही तर २४ तास डोळ्यात तेल घालून कोरोना रुग्णांसाठी या यंत्रणेचा प्रभावी वापर व्हायला हवा असं मत मांडून राज्यातील एक श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिका गणली जाते
कोरोना नियंत्रणासाठी नियमानुसार जेवढा खर्च करायचा आहे तेवढा खर्च पालिकेने करावा असेही ते म्हणाले. पालिका हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा ,कचरा उचलावा, बंद पथदिवे सुरू करा, पालिकेचे मयत कोरोना योद्धे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन तरतूद केलेला मदतनिधी तात्काळ दिला पाहिजे, निमोनिया आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले पाहिजे, कोरोना चे काम करणारे कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचे थकीत वेतन विनाविलंब देण्यात यावे, श्वसनाच्या आजारांची वाढती संख्या पाहता महापालिकेने स्वतः ऑक्सिजन निर्मितीचे युनिट सुरू करावे अथवा एमआयडीसी भागातील बंद पडलेले ऑक्सीजन निर्मितीचे कारखाने स्वतः सुरू करावेत अशा अन्य महत्त्वपूर्ण मागण्या देखील नाईक यांनी या बैठकीत केल्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी त्यांना दिले
या बैठकीस माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक,माजी महापौर जयवंत सुतार,माजी महापौर सागर नाईक,माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार, स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक अशोक गुरखे,माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, भारतीय जनता पार्टी महामंत्री निकम माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे,प्रदीप गवस,निशांत भगत, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेवक विशाल डोळस, शिक्षण समिती च्या माजी उपसभापती राजश्री कातकरी, प्रभाग समिती सदस्य सुनिल कुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

 450 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.