‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहिम
शहापुर : महाराष्ट्र सरकारने नुकताच जाहीर केलेला “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”या महत्वाकांक्षी आरोग्य मोहिमेचा आज नांदगाव उपकेंद्रात सोगाव गणाचे सदस्य तथा माजी उपसभापती सुभाष हरड सर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कोविड वर नियंत्रण मिळवण्याकरीता ग्रामपंचायत क्षेत्रात १५ सप्टेंबर ते १०ऑक्टोबर या कालावधीत ‘माझे कुटूंब,माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.
आज सोगाव पं. स.गणातील नांदगाव उपकेंद्रात शहापूर पंचायत समितीचे सदस्य, गटनेते व माजी उपसभापती सुभाष हरड सर यांचे हस्ते या आरोग्य मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक पद्माकर करण, आरोग्य सेविका सुरेखा माढा, आशा कर्मचारी शुभांगी धानके, ब्लॉक फॅसिलेटर प्रतीक्षा धानके, भगवान धानके व महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या आरोग्य मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी, आशा व पथक थर्मल स्कॅनर,प्राणवायू मोजणारे यंत्र आणि इतर साहित्य घेऊन घरोघरी जाऊन संशयित कोविड तपासणी करणार आहेत.
556 total views, 1 views today