वसंत व्हॅली कोविड सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

५५ ऑक्सिजन बेड्स आणि ९ आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध

कल्याण : कल्याण डोंबिवली मधील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कल्याण मधील वसंत व्हॅली याठिकाणी ५५ ऑक्सिजन बेड्स आणि ९ आयसीयू बेड्स अशा ६४ बेड्सच्या समर्पित कोविड सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राशेजारी आरक्षण असलेल्या नियोजित सुतिकागृहाच्या तीन मजली इमारती मध्ये एप्रिल मध्ये काँरटाईन् सेन्टर सुरु केले होते. आता त्या ठिकाणी सुविधायुक्त कोवीड उपचार केन्द्र साकरण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका खंबीरपणे लढा देत मनपाच्या माध्यमातून काँरटाईन् सेन्टर व कोवीड रूग्णालये सुरू करून कोवीड रूग्णांना उपचार सेवा उपलब्ध करून देत आहे.
वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोवीड रुग्णालयाच्या माध्यमातून ५४ ऑक्सिजन बेड्स तसेच ९ आयसीयू बेड्सची व्यवस्था उपलब्द्ध करून देण्यात आली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने उभारण्ययात आलेल्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गास निर्देश दिले व डॉक्टर आणि सपोर्टींग स्टाफचे कौतुक करीत मनोबल वाढवले.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात देखील आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येतील. महापालिकेतर्फे कोव्हिड रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेतर्फे स्क्रिनिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सह मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्ट, आरटी पीसीआर टेस्ट वाढविण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारचा एक महिन्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे. त्याअंतर्गत घरा घरात महिन्यातुन दोनदा ज्या रुग्णांना इतर काही आजार आहेत त्यांची तपासणी करण्यात येईल. यापूर्वी देखील मास स्क्रीनिग करण्यात आली आहे. आता पुन्हा एक महिन्याचा ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. त्यात राज्य शासन आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी सर्वाच्या सहभागाने हे राबवण्यात येणार असून यामुळे रुग्णांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान कल्याण परिसरातील कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल असे आयुक्त डाँ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

 372 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.