वैद्यकिय शिक्षण प्रवेशासाठी आता एक महाराष्ट्र एक मेरिट

वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान विभागातंर्गत अर्थात वैद्यकिय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राज्यात ७०:३० ची प्रवेश पध्दत कार्यान्वित होती. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी वंचित रहात होते. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता एक महाराष्ट्र एक मेरिट यानुसार एनआयआयटी मार्फतच परिक्षा होणार असल्याची घोषणा वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली.
विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. त्यांनी घोषणा करताच सर्व आमदारांनी बाके वाजवून स्वागत केले.
आरोग्य विज्ञान अर्थात वैद्यकिय शिक्षणाच्या प्रवेशासाठी ७०:३० हि कोटा पध्दत होती. या पध्दतीमुळे ७० टक्के स्थानिक विद्यार्थ्यांना तर ३० टक्के राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होते. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी यापासून वंचित रहात होते. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकच सुत्र आणि एकच मेरिट लागू करण्याच्या उद्देशाने एनआयआयटी या परिक्षेमार्फत जे उत्तीर्ण होतील त्यांनाच आता वैद्यकिय शिक्षणाला प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 432 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.