माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची ‘फ’ प्रमाणे ठरवावी व त्यानुसार डीएड शिक्षकांचा पदवी नतंर प्रवर्ग ‘क’ मध्ये समावेश करण्याची आहे मागणी
शहापुर (शामकांत पतंगराव) : सेवा ज्येष्ठता व पदोन्नती बाबतीत डीएड पदवीधर शिक्षकांवर होणा-या अन्याया विरोधात महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघातर्फे पदवीधर शिक्षकांनी शनिवारी (ता. ५) लाक्षणिक उपोषण केले. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व अटी व नियम पाळून वासिंद विभागातील शिक्षक यात सहभागी झाले. याबाबत माहिती देताना महासंघाचे मुंबई व कोकण विभाग सचिव व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काळुराम धनगर यांनी सांगितले की, खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे होते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची ‘फ’ प्रमाणे ठरवावी व त्यानुसार डीएड शिक्षकांचा पदवी नतंर प्रवर्ग ‘क’ मध्ये समावेश करावा. याबाबत राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार व अवर सचिव यांचे परिपत्रक ३ मे २०१९ व पत्र १९ आक्टोबर २०१९ नुसार अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यांत उपसंचालक ए. एस. पेदोंर यांनी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात अमंलबजावणी करून डीएड पदवीधर शिक्षकांना सेवा ज्येष्ठता व पदोन्नोती बाबत न्याय द्यावा. शिक्षणाधिकाऱ्यांमधे या निर्णय अंमलाबाबत राज्यभर एकवाक्यता असावी. या मागण्यांसाठी संपुर्ण राज्यात महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी घरात राहूनच लाक्षणिक उपोषण केले. याबाबत यापूर्वी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार व निषेध आंदोलन करूनही न्याय न मिळाल्याने नाईलाजाने शिक्षकदिनी आम्हाला हे उपोषण करावे लागेल, असे धनगर यांनी सांगितले.
486 total views, 2 views today