तपासणीनंतर दोन्ही फुफुसात गंभीर निमोनिया संसर्ग झाल्याचे आढळून आले. यावर डॉक्टरांनी उपाययोजना सुरू केल्या. मात्र निमोनियाच्या संसर्गामुळे या भगतराव साळुंखेना श्वसनाचाही त्रास होऊ लागला. त्यामुळे कृत्रिम श्वासोश्वास देवून उपचार करण्यात आले.
ठाणे : कोरोनाची भीती सर्वांनीच घेतली आहे. मात्र आत्मविश्वासाने उपचारास सामोरे गेल्यास तसेच वेळेत योग्य उपचार मिळाल्यास कोरोनावर यशस्वीपणे मात करता येवू शकते. याचा प्रत्यय ठाणेकरांना आला. कोरोनामुळे फुफुसात गंभीर निमोनिया संसर्ग झालेला असताना देखील ५५ वर्षीय कोरोनाबाधित पोलिसाने तब्बल ७२ दिवस मृत्यूशी झुंज देवून कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणारे राबोडी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस उपनिरीक्षक भगतराव साळुंखे वय ५५ वर्षीय यांना १८ जून रोजी कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ठाण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले याठिकाणी त्यांच्यावर सुमारे बरेच दिवस उपचार करण्यात आला परंतु कोरोनामुळे फुफुसात गंभीर निमोनिया संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चांगल्या दवाखान्यात दाखल करणे आवश्यक होते यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी प्रयत्न केल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात दा्नखल केल्यानंतर डॉक्टरांनी परिस्थितीनुसार तातडीने उपचारास सुरुवात केली. मात्र तपासणीनंतर तिच्या दोन्ही फुफुसात गंभीर निमोनिया संसर्ग झाल्याचे आढळून आले. यावर डॉक्टरांनी उपाययोजना सुरू केल्या. मात्र निमोनियाच्या संसर्गामुळे या साळुंखे श्वसनाचाही त्रास होऊ लागला. त्यामुळे कृत्रिम श्वासोश्वास देवून उपचार करण्यात आले.बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ अव्या बन्सल यांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर अखेर ७२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर साळुंखे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.घरी आलेली साळुंखेंची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी घरी जाऊन भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच कुटुंबाशी संवाद साधला.
उपचारानंतर बरे झाल्यावर सहा पोलीस उपनिरीक्षक भगतराव साळुंखे यांनी त्यांना उपचारासाठी मदत करणारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राबोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे व ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी,कर्मचारी, त्यांचे मेव्हूणे ठाणे ग्रामीण पोलीस किशोर पाटील तसेच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करणेसाठी मोलाची साथ देणारे सिनीअर लॅब सुपरवायझर विकास मेटांबे व अनिल शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत. सर्वानी केलेल्या प्रयत्नामुळे मला योग्य उपचार मिळलेले म्हणून मी या कोरोनाच्या आजारातून बरा झालो असे श्री साळुंखे यांनी सांगितले
519 total views, 1 views today