बिल्डर लॉबीकडेच लक्ष न देता सामान्य जनतेच्या नागरी सुविधांकडेही लक्ष द्या

राष्ट्रवादीच्या नोवेल साळवे यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने फक्त बिल्डर लॉबीकडेच लक्ष न देता सामान्य जनतेच्या नागरिक सुविधांकडेही लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सचिव नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने महापालिकेतून १८ गावं वगळून त्यांच्या सर्व कायदेशीर प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली होती, त्यात नवीन बिल्डिंग व बांधकामाचा ही समावेश होता. आता नगरविकास विभागाने बिल्डर लॉबीला सहानुभूती दाखवत कल्याण महापालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत की या १८ गावातील विकासकांना विकास कामे करण्यासाठी परवानगी द्यावे. परंतु अशी सहानुभूती नगरविकास विभागाने इथल्या सामान्य नागरीकांच्या प्रश्नावर दाखवली नाही.
काही दिवसांपूर्वी कल्याण महापालिका प्रशासनाच्या उद्धट व गलथान कारभाराविरोधात नागरी हक्क संघर्ष समितितर्फे भर पावसात भिजून काही समाजसेवकांनी आंदोलन केले होते. त्या वेळेस नगरविकास विभागाने दखल घेतली नाही. कल्याण महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यावर लोकप्रतिनिधी ही मुंग गिळून गप्प आहेत. सध्या महापालिकेच्या निवडणूका समोर बघून बहुतेक लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांनी उठाठेव सुरू केली आहे. परंतु नागरिकांच्या मूलभूत प्रश्न तसेच आहेत. ज्यावर कल्याण महापालिका प्रशासन आजिबात गंभीर नसल्याचा आरोप नोवेल साळवे यांनी केला आहे.
२०१८ साली कल्याण महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या नावा खाली काही सार्वजनिक शौचालय व मुतारी तोडली होती, वारंवार निवेदन देऊन सुद्धा ती परत बांधली गेली नाही. नागरिकांचे असे अनेक प्रश्न आहेत, त्यावर आता कोरोना मुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नगरविकास विभागाला नागरिकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्यासाठी सुचना द्याव्यात अशी मागणी नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

 355 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.