…अन्यथा प्रत्येक शाळेवर गुन्हा दाखल करू

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा निर्वाणीचा इशारा

अचलपूर : राज्यातील अनेक शाळांकडून अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. अधिकची फि घेण्याचे आता आढळून आले तर वाढीव फि घेणाऱ्या प्रत्येक शाळांवर गुन्हा दाखल करू असा इशारा देत शाळांनी नफेखोरी करू नये असे आवाहनही शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.
शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वाढीव फि आकरण्यात येत असल्याच्या सततच्या तक्रारींवर ट्विट्रवरून त्यांनी दिला.
राज्यातील शाळा या धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या आहेत. धर्मादाय अर्थात सेवेच्या नावाखाली शाळांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या शाळांनी आपली नोंदणी कंपनी कायद्याखाली नोंदविली नाही. त्यामुळे शाळांनी अधिकचे शुल्क आकारून पालक आणि विद्यार्थ्यांची लुबाडणूक करू नये असे सांगत गरिब पालकांकडून अशा तक्राऱ्या आल्या तर शाळांवर गुन्हे नोंदविणार असल्याचा इशारा दिला.

 426 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.