एशियन पेण्ट्सच्या ट्रॅक्टर शाइन, एसीई शाइनसाठी नवीन अभियान

शाइन जो दिखे महंगी या मध्यवर्ती विषयासह, “महागडा भासणारा” चमकदार व दीर्घकाळ टिकणारा रंग प्रत्यक्षात महागडा असण्याची गरज नाही हे एका सुंदर गोष्टीद्वारे सांगणारी टीव्हीसी

मुंबई : एशियन पेंट्सने त्यांच्या परवडण्याजोग्या रंगांच्या श्रेणीसाठी नवीन टीव्हीसी प्रदर्शित केली आहे. या श्रेणीत दीर्घकाळ टिकणारे व सुंदर चमक असलेले ट्रॅक्टर इमल्शन शाइन रंग आतील भिंतींसाठी, तर एस शाइन रंग बाहेरील भिंतींसाठी आहेत. दोन्ही प्रकारच्या रंगांसाठी तीन वर्षाची कामगिरीची वॉरंटी आहे. यामुळे भिंती अत्यंत लग्झरियस दिसत राहतील हे निश्चित.
घराच्या मालकांसाठी त्यांचे घर हे सर्वांत मौल्यवान सामाजिक चलन असते. त्यांच्या समाजातील प्रगतीची खूण असते. या ग्राहकांसाठी त्यांची सुंदर घरे मित्रमंडळींना व शेजाऱ्यांना अभिमानाने दाखवणे हे एक साधन आहे. म्हणूनच घराला रंग देणे हे महत्त्वाचे अंग आहे आणि घर नवीन दिसत राहावे, दीर्घकाळ चमकत राहावे आणि हे सगळे बजेटमध्ये शक्य व्हावे अशी घराच्या मालकांची अपेक्षा असते.
या वास्तवापासून प्रेरणा घेत ऑगिल्व्ही इंडियाने छोट्या शहरात राहणाऱ्या एका मुलाच्या गोष्टीला आकार दिला आहे; चिंटू आणि त्याच्या घरी आलेले त्याचे मित्र. ट्रॅक्टर इमल्शन शाइन आणि एस शाइन इमल्शन यांच्या मदतीने रंगवलेल्या सुंदर चमकदार भिंती बघून चिंटूच्या मित्रांवर चांगलीच छाप पडते. चिंटूची एकंदर जीवनशैली खूपच भव्य आहे असे ते सहज गृहीत धरतात पण नंतर असे काही नाही आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना खूपच मजा वाटते.

 366 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.