राजकीय पक्षांनी फुकटच श्रेय घेऊ नये

भारतात स्वच्छ शहर हा लौकिक नवी मुंबई शहराला सफाई कामगारांमुळे-रवींद्र सावंत अध्यक्ष इंटक

नवी मुंबई : केंद्र शासनाने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान अंतर्गत निकाल नुकताच जाहीर केला.यामध्ये चार श्रेणी मिळवत देशात तिसरा क्रमांक नवी मुंबई शहराला प्राप्त झाला आहे.मात्र यासाठी झटणारे कामगार आणि घनकचरा विभाग नवी मुंबई प्रशासन याचबरोबर स्थानिक जनतेच्या मेहनतीमुळे हा मानाचा तुरा खोवला आहे.तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सफाई कामगारांनी यशस्वी केले आहे.मात्र नेहमीच्या सवयीने नवी मुंबई शहरातील काही राजकीय नेत्यांनी जणू आपल्यामुळेच हा मान मिळाला अश्या अविर्भावात आयुक्तांची भेट घेऊन कामगारांचा झुठफुट सत्काराची नौटंकी केली.कामगारांना वेतन आयोग देण्यासाठी सत्तेत असताना स्थायी समितीच्या बैठकीत यासाठी संघर्ष करावा लागला.कामगार विरोधी धोरण राबवणाऱ्या नेत्यांनी फुकटचे फौजदार बनत आज माजी खासदार,माजी महापौर,अश्या नेत्यांनी श्रेयबाजीसाठी केलेली धडपड लांछनास्पद आहे.नवी मुंबई शहराला देशात मिळालेला तिसरा क्रमांक याचे श्रेय सर्वात आधी स्वच्छता दूत असणाऱ्या सफाई कामगार यानंतर शहरातील नागरिक आणि मनपा प्रशासन यांचे असून उगाच येऊ घातलेल्या मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लुडबुड करणाऱ्या नेत्यांनी हे श्रेय घेऊ नये.

 353 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.