व्यावसायिक सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत वाल्वोलाइनने दिल्ली, मुंबई, लखनौ, चेन्नई अशा जवळपास १०० बाजारपेठांमध्ये ७०,००० हून अधिक सुरक्षा किट्सचे वाटप केले आहे
मुंबई : वाल्वोलाइन कमिन्स प्रा. लि. (Valvoline Cummins Pvt. Ltd) ही जगभरात प्रिमिअम ब्रॅण्डेड ल्युब्रिकण्ट्स, तसेच ऑटोमोटिव्ह सेवा देणारी आघाडीची कंपनी नाविन्यता सादर करण्यामध्ये नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे आणि कंपनीने तिच्या विभागामधील विश्वसनीय कंपनी म्हणून स्वत:चे नाव स्थापित केले आहे. कंपनीने तिचा पहिला सुरक्षा उपक्रम सादर केला. या उपक्रमांतर्गत ते संपूर्ण देशभरातील मेकॅनिक्सपर्यंत पोहोचत त्यांना ‘सुरक्षा किट’ देत आहेत आणि अनलॉकनंतर घ्यावयाच्या आवश्यक सुरक्षितताविषक मार्गदर्शकतत्त्वांबाबत त्यांना जागरूक करत आहेत.
वाल्वोलाइनने त्यांच्या सुरक्षा उपक्रमांतर्गत दिल्ली, मुंबई, लखनौ, चेन्नई, हैद्राबाद, इंदौर अशा जवळपास १०० बाजारपेठांमध्ये ७०,००० हून अधिक सुरक्षा किट्सचे वाटप केले आहे. आज कंपनी बाजारपेठांतील मेकॅनिक्सपर्यंत देखील पोहोचली. सुरक्षा किट्समध्ये ४ मास्क्स, १०० मिली सॅनिटायझर व एक टोपी यांचा समावेश आहे.
”वाल्वोलाइनने नेहमीच विश्वासार्हतेला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच आम्ही कार्यरत असलेल्या ठिकाणामधील आमचे कर्मचारी, ग्राहक, व्यवसाय भागीदार व समुदायाच्या सुरक्षिततेला अधिक महत्त्व देतो. या सुरक्षा किट्सचे वितरण करण्याच्या माध्यमातून वाल्वोलाइनचा प्रत्यक्ष आघाडीवर काम करत असलेले कर्मचारी सुरक्षितपणे कार्यरत राहतील आणि त्यांना त्यांच्या आरोम्याबाबत चिंता करण्याची गरज भासणार नाही याची खात्री घेण्याचा मनुसबा आहे. वाल्वोलाइनमध्ये आमचा विश्वास आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाला स्वत:ला सुरक्षित ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे,” असे वाल्वोलाइन कमिन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संदीप कलिया म्हणाले.
वाल्वोलाइन च्या अतिरिक्त उत्पादन व कंपनी माहितीसाठी कृपया www.valvoline.com-en/india येथे भेट द्या.
592 total views, 1 views today