रुग्णवाहिकांची वेळच्या वेळी देखभालदुरुस्ती केली जात नसल्यानेच अचानकपणे गाडी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहापूर : शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिकेचा शहापूरजवळील सापगाव येथे काल(दि.१७ )अपघात झाला. सुदैवाने रुग्णवाहिकेचा चालक व आत असलेल्या रुग्णांना कुठलीही दुखापत झालेली नसल्याचे समजते. टाकीपठार येथून रुग्ण घेवून ही रुग्णवाहिका शहापूरकडे जात असताना अचानक एक रॉड तुटल्याने पलटी झाली. ग्रामीण रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांची वेळच्या वेळी देखभालदुरुस्ती केली जात नसल्यानेच अचानकपणे गाडी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान सापगाव ते शहापूर या रस्त्याचे काम रखडल्याने पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांत अनेक वाहनांचे किरकोळ अपघात वाढलेले असून वाहनचालकही हैराण झालेले आहेत.
722 total views, 1 views today