ईश्वर उखा पाटील यांना प्रथम पुरस्कार

संतोष दवणे द्वितीय, तर प्राजक्ता कुलकर्णी ठरल्या तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्या

राज्यस्तरीय काव्यस्पर्धेतून कोरोना जनजाग्रुती

शहापूर : कोविड-१९ च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये खबरदारी व उपाययोजना याबाबत जाणीवजागृती करण्यासाठी शहापूरच्या स्वामी समर्थ कलामंच व माझा बाप हमाल प्रतिष्ठान, डोळखांब यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कोरोनाजाग्रुती काव्यलेखन स्पर्धेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील कवी ईश्वर उखा पाटील प्रथम, शहापूरचे कवी संतोष दवणे द्वितीय व कल्याण येथील कवयित्री प्राजक्ता कुलकर्णी तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. कवी संजय मेश्राम (परभणी), विजय धानके(शहापूर), संदीप राठोड(नगर), प्रकाश फर्डे(शहापूर) यांच्या कवितांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले आहे. डोळखांबचे लोकप्रिय अभिनेते व कवी सुभाष शिंदे यांच्या माध्यमातून ही राज्यस्तरीय काव्यस्पर्धेची संकल्पना राबवली गेली.शहापूरचे ज्येष्ठ ग्रामीण कवी प्रा.गोपाळ वेखंडे, मधुकर हरणे, केशव शेलवले यांनी राज्यभरातून आलेल्या कवितांचे परीक्षण केले. अव्वल ठरलेल्या कवितांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व राज्यभरातून आलेल्या ३६ कवितांना डिजीटल प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती स्पर्धाप्रमुख चंदन फुलपगार यांनी दिली.जनजागृतीसाठी या कविता राज्यभर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केल्या जाणार आहेत.

 551 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.