डोंबिवलीत वीज ग्राहक जन आक्रोश मंचचे वीज कंपनीला निवेदन

कमीत कमी लॉकडाउन च्या काळातील तीन महिन्यांची तरी बिले माफ व्हावीत, दरवाढ रद्द व्हावी तसेच एप्रिल पासून वाढलेले दरही पूर्वी प्रमाणेच ठेवण्याची केली मागणी

डोंबिवली : लॉकडाऊन मध्ये एकीकडे कामावर जाने शक्य होत नसताना दुसरीकडे मात्र वाढीव वीज बिले पाहून सामान्य नागरीका पुरते हैराण झाले आहे.राज्य सरकार यावर तोडगा काढण्यास उशीर करीत असल्याने या काळात नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देत शेकडो ग्राहकांच्या वतीने वीज ग्राहक जन आक्रोश मंचने डोंबिवलीतील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अमित दुखंडे, समाजसेवक संतोष सावंत,, आर.टी. आय. कार्यकर्ता संजय गायकवाड, राजू शिंदे इतरही अनेक ग्राहक व पदाधिकारी यांनी निवेदन दिले.महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरणने लॉक डाऊनच्या काळात वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले देऊन कोरोनाच्याही भीतीपेक्षा महावितरण ने जो सर्व सामान्यांना शॉक दिला आहे, त्यामुळे जनतेत आक्रोश दिसून येत आहे. नोकऱ्या धंदे बुडाल्याने अनेकांचे संसार विस्कळीत झाले आहेत.
यामुळेच अनेक लोकांमध्ये महावितरणच्या बद्धल नाराजी आहे.अनेक ठिकाणी संघटनेच्या वतीने महावितरणच्या विरोधात शासन प्रशासनाला जाग यावी याकरिता आंदोलने चालू झाली आहेत, लोकांचे म्हणणे आहे की, कमीत कमी लॉकडाउन च्या काळातील तीन महिन्यांची तरी बिले माफ व्हावीत, दरवाढ रद्द व्हावी तसेच एप्रिल पासून वाढलेले दरही पूर्वी प्रमाणेच रहावेत.याचसाठी म्हणूनच डोंबिवली पश्चिम आनंदनगर कार्यालयात तसेच डोंबिवली पूर्व येथील वीज कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे शेकडो ग्राहकांच्या वतीने वीज ग्राहक जन आक्रोश मंचच्यामार्फ़त निवेदन देण्यात आले.

 342 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.