राष्ट्रवादीच्या वतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आला उपक्रम

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी घोडबंदर महिला ब्लॉकच्या वतीने कोविड योद्ध्यांना सॅनिटायझर आणि मास्क-ग्लोव्हजचे वाटप करण्यात आले.
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी “माझा वाढदिवस साजरा करू नका शुभेच्छांचे बॅनर लावू नका, त्याऐवजी सामाजिक कर्तव्ये पार पाडा” असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक सुहास देसाई, ओबीसी सेलचे नेते राज राजापूरकर, शहर उपाध्यक्ष दादासाहेब गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी घोडबंदर महिला ब्लॉक च्या अध्यक्षा रानी देसाई यांच्यातर्फे कासारवडवली, आनंद नगर, पाटलीपाढा एम एस ई बी कार्यालय, कासारवडवली पोलिस स्टेशन, वाघबीळ ट्रॅफिक पोलिस चौकी, ठामपा आरोग्य केंद्र, आणि ठामपा मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलिस, एम एस ई बी कर्मचारी, ठामपा सफाई कामगार, यांनाा मास्क, सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोव्हजचे वाटप केले.

 487 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.