अंकुर बाल विकास केन्द्रातील निराधार विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

पत्रकारांच्या पुढाकाराने साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि नित्यानंद हॉस्पिटल यांनी राबवला उपक्रम

  कल्याण : टिटवाळ्यातील अंकुर बालविकास केन्द्रातील निराधार गरीब विघार्थ्याची मोफत आरोग्य तपासणी साई  होमिओपॅथी मेडिकल काँलेज, नित्यानंद हाँस्पाटिल दुगाड फाटा भिवंडी आणि कल्याणातील पत्रकार यांच्या माध्यमातून करण्यात आली.                    
     अंकुर बालविकास केन्द्रातील निराधार, गरजु बालकांना संचलिका  अक्षदा भोसले यांनी आधार देत जवळील गणेश विघालयात शालेय शिक्षणाची सोय करून शिक्षणाच्या प्रवाहात आण्याचे योगदान करीत आहेत.   अंकुर बाल विकास केन्द्रातील या लहानग्या विघार्थ्यासाठी सामजिक बांधलीकीतुन काही करता यावे म्हणुन कल्याणातील पत्रकार दतात्रेय बाठे, अशोक कांबळे, दिनु जाधव, कुणाल म्हात्रे, दिपक मोरे, अतुल फडके, दिपक बागुल यांनी एकत्र येत, अशोक कांबळे यांच्या पुढाकाराने साई होमिओपॅथी मेडिकल काँलेज आणि नित्यानंद हाँस्पाटिल दुगाड फाटा ,भिवंडी चे  डाँ. जे पी शुक्ला ( प्रोजेक्ट इनचार्ज), डाँ सुधीर म्हात्रे, भुपेंद्र सिंग (इनटेस्)  यांनी अंकुर बालविकास केन्द्रातील विघार्थ्यासाठी मोफत आरोग्य तपसणी करण्यात आली.
यासाठी साई होमिओपॅथी मेडिकल काँलेजचे डॉ. जे पी शुक्ला,  विद्यार्थी आभिषिका वाघचौरे, रौनक जेन, योगेश शुक्ला यांनी मेहनत घेतली. याप्रसंगी खेळीमेळीच्या वातावरणात सोशल डिस्टनचे पालन करीत अंकुर बालविकास केन्द्रातील निराधार मुलांना मास्क, खाऊ, आर्सेनिक अल्बम गोळ्याचे  वाटप डॉक्टर यांच्या पथकाने  केले. तर ओमकार बाठे यांनी निराधार मुलांसाठी डेटॉल साबणाचे वाटप केले. तसेच पेरू व लिंबू रोपाचे रोपण डॉ. जे पी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये केन्द्रातील विद्यार्थ्यानी गाणी म्हटली व अगळा आनंद लुटला. या कार्यक्रमानिमित्त निराधार मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे चित्र दिसत होते. दुगाड फाटा भिवंडी आणि कल्याणातील पत्रकार यांच्या माध्यमातून करण्यात आली.                    
    

 364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.