कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

९५०९ नवे बाधित रूग्ण , तर ९९२६ बरे होवून घरी २६० मृतकांची नोंद

मुंबई : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त असून ९५०९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ९९२६ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५४८ वर पोहोचली असून घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ७६ हजार ८०९ इतकी झाली आहे. तर २६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६२.७४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.५३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २२,५५,७०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,४१,२२८ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,२५,२६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,९४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 504 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.