साधला गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी वर्ष पुण्यतिथीचा मुहूर्त
मुंबई : गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने(चिंचपोकळीचा चिंतामणी) जन आरोग्य वर्षाचा कार्यारंभ सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी वर्ष पुण्यतिथी निमित्त आज शनिवार १ऑगस्ट २०२० रोजी आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराने करण्यात आला.
या शिबिरात मध्य प्रादेशिक विभाग मुंबई चे अतिरिक्त पोलिस आयुक्त विरेश प्रभू, विभागीय आमदार अजय चौधरी,आमदार यामिनी जाधव,कॉंग्रेसचे माजी आमदार मधू(अण्णा) चव्हाण, काळाचौकी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाटील, नगरसेवक रमाकांत रहाटे, डॉ.प्रागजी वाजा,शाखाप्रमुख हेमंत कदम विजय लिपारे,राजेश हाटले यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधून रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. या रक्तदान शिबिरासाठी एकूण १८८ रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले यामध्ये नवोदित रक्तदात्या तरुणांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. या रक्तदान शिबिरासाठी वाडिया रूग्णालय रक्तपेढी परळ यांचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सामाजिक अंतर राखून रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उमेश सीताराम नाईक मानदसचिव वासुदेव सावंत,कोषाध्यक्ष अतुल केरकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
493 total views, 2 views today