रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स या संस्थेने तयार केले कोव्हिड फ्री टॉयलेट

ठाणे महानगर पालिका आयुक्तां समोर प्रकल्पाचे सादरीकरण

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स
  या संस्थेचे सदस्य असणारे इंजि.जयराम मेंडन यांनी यु.व्ही.रेज (किरण) निर्माण करणारे युनिट तयार केले असून हे युनिट (यंत्र) शौचालयात बसवल्यावर शौचालयातील जिवाणू विषाणू मारण्याची क्षमता या यंत्रात आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा नायनाट देखील या किरणांमुळे होऊ शकतो. कोव्हिड फ्री टॉयलेट असे या प्रकल्पाचे नाव असून आज संस्थेच्या वतीने पालिकेने तयार केलेल्या कोव्हिड हॉस्पिटलच्या शौचालयात हे यंत्र बसविण्यासाठी संस्थेच्या शिष्टमंडळाने ठाणे पालिका आयुक्तांची भेट घेतली. भेटी दरम्यान कोव्हिड फ्री टॉयलेट या प्रकल्पाची माहिती देऊन २० यंत्र भेट दिले.
कोरोनाच्या महामारीत अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली तरी या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्ससंस्थेने देखील सध्याची गरज ओळखून कोव्हिडं फ्री टॉयलेट हा प्रकल्प तयार केला आहे. आज ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ.बिपीन शर्मा यांना संस्थेचे अध्यक्ष बीजय यादव, उपाध्यक्ष विजय शेट्टी,  माजी अध्यक्ष राधिका भोंडवे, इंजि.जयराम मेडन आदी मंडळींनी हा प्रकल्प काय आहे याची इत्यंभूत माहिती दिली.

काय आहे कोव्हिडं फ्री टॉयलेट प्रकल्प

यु.व्ही.अल्ट्रारेज निर्माण करणारी ट्यूबलाईट सारखे हे युनिट आहे.जसा विजेचा दिवा पेटतो तसा या मशीनच्या आत असणारा दिवा पेटतो. ही सेन्सर असणारी मशीन असल्याने जेंव्हा टॉयलेटमध्ये व्यक्ती नसेल तेव्हाच हे यंत्र कार्यान्वित होणार आहे. साधारण दर नऊ मिनिटांनी केवळ एक मिनिटांसाठी या यंत्रातील लाईट (दिवा) चालू होणार आणि टॉयलेटच्या आत असणारे जे विषाणू जिवाणू असतील ते  दिव्यातून येणाऱ्या किरणांमुळे मृत होतील. अशा प्रकारे कोव्हिडं फ्री टॉयलेट हा प्रकल्प आहे.

 383 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.