किन्हवलीत रचना दिनकर ; अस्नोलीत संकेत दिनकर प्रथम

ठुणे, मुगावचा निकाल १०० टक्के

शहापूर : बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही ९५ टक्केचा पल्ला पार केल्याचे दिसून आले असून शहापूर तालुक्यातील किन्हवलीच्या शहा विद्यालयात रचना लक्ष्मण दिनकर हिने ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. साक्षी प्रकाश दिनकर ९६ टक्के मिळवून द्वितीय क्रमांकाने तर धीरज गायकर व मानसी गगे प्रत्येकी ९४.८० टक्के गुण मिळवून त्रुतीय क्रमांंकाने उत्तीर्ण झाले आहेत.शहा चंदुलाल सरुपचंद विद्यालयाचा निकाल ९६.९५ टक्के लागला असून सोगाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२.१० टक्के लागला आहे.सा.गो.घनघाव माध्यमिक विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून शारदा विद्यालय ठुणेलाही १०० टक्के निकाल लावण्यात यश मिळाले आहे. अस्नोलीच्या प्रगती विद्यालयात ९३ टक्के गुण मिळवत संकेत दिनकर याने पहिला क्रमांक मिळवला असून विद्यालयाचा निकालही ९८ टक्के लागला आहे. तुंगेश्वर शिक्षण संस्थेच्या दहिवली माध्यमिक विद्यालयाचे ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रयाग विशे या विद्यार्थ्याने ९३.६० टक्के गुण प्राप्त करत पहिले स्थान मिळवले आहे.

 357 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.