राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदाही मुलींची बाजी, राज्यात ९६.९१ टक्के मुली झाल्या पास
मुबंई : अखेर महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास १७ लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात ९६.९१ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा ३.१ टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी ७७.१० टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं.
विभागनिहाय टक्केवारी अशी
कोकण – ९८.७७ टक्के
कोल्हापूर – ९७.६४ टक्के
पुणे – ९७.३४ टक्के
मुंबई – ९६.७२ टक्के
अमरावती – ९५.१४ टक्के
नागपूर – ९३.८४ टक्के
नाशिक – ९३.७३ टक्के
लातूर – ९३.०९ टक्के
औरंगाबाद – ९२ टक्के
दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com निकाल पाहू शकता.
473 total views, 1 views today