कारगिल विजय निमित्त भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडलकडून अभिवादन

कारगिल योद्ध्यांच्या पराक्रमाच्या आठवणींना दिला उजाळा

डोंबिवली : कारगिल विजय निमित्त भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडल कडून, स्फूर्ती स्थळ, कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक (डोंबिवली) येथे अभिवादन करण्यात आले.ह्या वेळी बोलताना भाजयुमो पूर्व मंडल अध्यक्ष मिहिर देसाई म्हणाले की, एकवीस वर्षांपूर्वी घडलेले कारगिल युद्ध आजही भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, भारतीय शौर्य आणि संयम ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून ह्याकडे पाहता येईल. सलग तीन महिने लढले गेलेले हे युद्ध, कारगिलची शौर्यगाथा प्रत्येक भारतीय तरुणाने अभ्यासली पाहिजे. कॅप्टन बात्रा व त्यांचे सहकारी, ह्या युद्धात शहीद झालेले भारतीय वीर जवान ह्यांना आदरांजली वाहण्यात आली. ह्या वेळी भाजयुमो डोंबिवली पुर्व मंडलचे कार्यकर्ते आणि डोंबिवली सायकल मित्र संघटनेचे श्रीपाद देशपांडे आणि भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मिहिर देसाई उपस्थित होते.

 469 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.