डोंबिवलीतील त्रिमूर्तीनगरमध्ये महिनाभरात १५ घरफोडी
डोंबिवली : लॉकडाऊन जाहीर झाल्यावर काही नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यसाठी गावी गेले. ही संधी साधत चोरट्यांनी बंद घराची माहिती काढत घरातील समान आणू मौल्यवान वस्तूंची चोरी केली. डोंबिवली पूर्वेला त्रिमूर्तीनगर येथे महिनाभरात सुमारे १५ घरफोडीच्या झाल्या. या सर्व घरफोडी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने चोरट्यांनी रामनगर पोलिसांना आव्हान केल्याचे दिसून येते.
त्रिमूर्तीनगर मधील रहिवासी असलेले योगेश लोंढे, अनिल सुरोशे, मोतीराम पवार, दिंगबर सुरडकर, मुजीम पठाण आणि काही रहिवाशी गावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्याची रात्रीच्या वेळी घराचे कडीकोयंडा तोडून घरातील मौल्यवान वस्तू चोरल्या.घरातील लोक गावी गेल्याने रहिवाश्यांनी रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. मात्र पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. आठ दिवसांपूर्वी शिवशंकर नगर येथे गुप्ता किराणा स्टोअरमध्ये चोरी झाली होती.गुरुवार २३ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा चोरट्याने ५ घरफोडी केली. त्रिमूर्तीनगर येथे हाताच्या पोट असलेले गरीब लोक राहतात. कोरीनाचे संकट आणि त्यात चोरी यामुळे येथील लोक भयभीत झाले आहेत. भाजप डोंबिवली शहर सचिव राजू शेख हे यासंदर्भात लवकरच रामनगर पोलीस ठाण्यात निवेदन देणार असून चोरट्यांना अटक करा अशी मागणी करणार आहेत.
672 total views, 1 views today