आठवडाभरात पवार कोरोनावर मात करत घरी परतले आहेत.
कल्याण : भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार कोरोनावर मात करून घरी परतले असून पूष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना १५ जुलै रोजी कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आठवडा भरात पवार कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. गुरवारी रात्री ते घरी परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पूष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.
सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, प्रार्थना आणि प्रेमामुळे मी कोरोनाला हरवून सुखरूप घरी आलो. गेल्या काही दिवस माझे योगदान आणि कर्तव्य म्हणून मी सक्रियपणे काम करत होतो आणि हे करत असताना कोरोना आपल्याला कधीतरी होईलच याची जाणीव होती. एकदाच बाधा झाली आणि आता काही दिवस उपचार घेऊन मी हॉस्पिटलमधून आलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या सर्वांमध्ये येईन, सक्रियपणे कामाला सुरुवात करीनच. या सर्व काळामध्ये सर्वांनी खूप मोठं बळ दिले, माझे मनोबल वाढवले, पतंजली योग पीठ आणि काही भाजपा कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी हवन व महामृत्युंजय मंत्राचे पठणही केले. या सर्वांच्या सदैव ऋणात असेन अशी प्रतिकिया यावेळी नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
443 total views, 2 views today