सर्वेक्षणासाठी आशा वर्कर, आगंणवाडी सेविका यांना मनपा देणार मानधन

परिचयाच्या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाच्या कामात सहभागी केल्यास त्या अंगणवाडी सेविकेस, आशा वर्कर्सना प्रति स्‍वयंसेवक १०० रुपये इतकी प्रोत्‍साहनपर रक्‍कम

कल्याण : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेञात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कटेंटन्‍मेंट झोन मधील सर्वेक्षण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महापालिका कर्मचा-यांबरोबरच स्‍वयंफूर्तीने काम करणा-या स्‍वयंसेवकांचा सहभाग देखिल आवश्‍यक आहे. या स्‍वयंसेवकांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी दररोज १५० घरांचे सर्वेक्षण केल्‍यास त्यांना ३५० रुपये इतकी प्रोत्‍साहनपर रक्‍कम अदा केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी व आशा वर्कर्सनी कोव्हिड -१९ करीता कंटेंटमेंन्ट झोनमध्ये प्रति दिन १५० घरांचे सर्वेक्षण केल्यास प्रत्येक अंगणवाडी सेविकेस व प्रत्येक आशा वर्कर्सला त्या दिवसाचे ३५० रुपये इतके मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी,आशा वर्कर्सनी त्यांचा परिचयाच्या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाच्या कामात सहभागी केल्यास त्या अंगणवाडी सेविकेस, आशा वर्कर्सना प्रति स्‍वयंसेवक १०० रुपये इतकी प्रोत्‍साहनपर रक्‍कम एकदाच दिली जाईल. माञ त्‍या स्‍वयंसेवकाने किमान १ महिना सर्वेक्षणाचे काम समाधानकारकरित्‍या पूर्ण केल्‍यावरच ही प्रोत्‍साहनपर रक्‍कम त्‍या अंगणवाडी सेविकेस, आशा वर्कर्सला दिली जाईल.
या योजने अंतर्गत सहभागासाठी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी नजीकच्‍या नागरी आरोग्‍य केंद्रांशी संपर्क साधून काम करायचे आहे, असे आदेश महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

 579 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.