ओकिनावाची विस्तार योजना

आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत ५०० डिलरशिप्सचा टप्पा गाठणार

मुंबई : ओकिनावा या आघाडीच्या ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने अधिकाधिक डिलरशिप विस्तारीकरण योजनांची घोषणा केली आहे. कंपनीचे सध्याचे ३५० हून अधिक डिलर नेटवर्क ५०० डिलरशिप नेटवर्कपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ब्रॅण्डने त्यांची उपस्थिती वाढवण्या व्यतिरिक्त प्रमुख डिलर्ससोबत उप-डिलर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी योजना आखली आहे. नुकतेच ब्रॅण्डने कोव्हीड-१९ प्रादुर्भावा दरम्यान भागीदारांना साह्य करण्यासाठी डिलरशिप मार्जिन्समध्ये ८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. कंपनी प्रामुख्याने महाराष्ट्र, बिहार, आसाम या राज्यांसह पूर्वेकडील शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक जीतेंदर शर्मा म्हणाले की, ‘बाजारपेठेला गती मिळण्यासाठी काहीसा अवधी लागेल याबाबत काहीच शंका नाही. स्थिती हळूहळू सुरळीत होत असताना आम्ही ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी देशभरात विस्तार करण्याची योजना आखत आहोत. कोव्हीड-१९ चे प्रमाण कमी होत असताना खाजगी वाहनांसाठी मागणी वाढेल. इलेक्ट्रिक वाहने आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य ठरत आहेत, हे पाहता लोक त्यांचा वापर करू पाहतील. आम्ही शहरांमधील आमच्या ग्राहकांना उत्पादने व सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आमची पोहोच वाढवत आहोत.’
ब्रॅण्डने ओकिनावाशी संलग्न होण्याची इच्छा असलेल्या डिलर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे. कंपनीने सुरक्षितता विषयक नियमांचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. सोबत ओकिनावा डिलर्सना त्यांच्या इलेक्ट्रिफाईंग मोबिलिटी आकांक्षेचा भाग बनण्यास आवाहन करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा अवलंब करत आहे. ब्रॅण्ड कठोर कार्यसंचालन प्रक्रियांचे पालन करत आला आहे आणि त्यांच्या भागधारकांचे आरोग्य व स्वास्थ्याप्रती कटिबद्ध आहे.

 439 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.