नाहीतर त्यांच्यावर कारवाई करा

महापालिका आयुक्तांची भाजीपाला मार्केटला भेट
सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणाऱ्यांना दिला इशारा

ठाणे : महापालिकेच्यावतीने गेले तीन दिवस जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट परिसरात करण्यात येणा-या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भाजीपाला मार्केटला भेट देऊन सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणा-याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले.
ठाणे शहरामध्ये हॉटस्पॉट वगळता उर्वरीत ठिकाणी लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. तथापि हॉटस्पॉटच्या ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तसेच बाजारपेठा, मंडई या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा हयांनी सर्व अधिका-यांना कडक सूचना देऊन हॉटस्पॉटची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर हॉटस्पॉटस् आणि बाजारपेठाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट, महात्मा फुले मंडईची पाहणी केली. तसेच या परिसरात करण्यात आलेल्या बॅरॅगेटींगचीही पाहणी केली.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी बाजारपेठेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच याचे उल्लंघन करणा-यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्या सोबत उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.

 642 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.