खारीगाव मधील ते पहिले मॅट्रिक पास होते. कळवे ग्रामपंचातीचे ते ११ वर्ष उपसरपंच होते.
ठाणे : जी पी पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक जयराम पाटील (वय ७९) यांचे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन मुंबई मधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
जयराम पाटील हे खारीगाव मधील पहिले मॅट्रिक पास होते. कळवे ग्रामपंचातीचे ते ११ वर्ष उपसरपंच होते. जी पी पारसिक बँकेच्या स्थापने पासून ते आतापर्यंत संचालक राहिलेले आहेत. दोन वेळा चेअरमन होण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला होता. जयभारत स्पोर्ट्स क्लबचे ते संस्थापक होते. जेष्ठ नेते दशरथ पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांचे ते जेष्ठ बंधू आहेत. प्रसिद्ध व्यावसायिक जगदीश पाटील, संदीप पाटील यांचे ते वडील आहेत. त्यांच्या निधाने कळवा, खारीगाव मध्ये शोककळा पसरली आहे.
563 total views, 1 views today