आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या सर्व सुविधांयुक्त ३ रुग्णवाहिकेंचे लोकार्पण

महापालिका आयुक्त अभिजित बांगर तसेच भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते संपन्न
 
नवी मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबईतील नागरिकांना रुग्णवाहिकांची कमतरता भासू नये, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आमदार निधीतून ३ सुसज्ज अशा सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या. सदर रुग्णवाहिका या कार्डियाक रुग्णवाहिका असून त्यात ऑक्सिजन सुविधा, बेसिक इंजेक्शन, स्ट्रेचर, प्राथमिक उपचार, फायर सिस्टम, इमर्जन्सी रिस्पॉन्स फ्लॅशिंग लाईट  अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.सदर रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  यावेळी माजी सभापती संपत शेवाळे, महामंत्री विजय घाटे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, दत्ता घंगाळे, भरत जाधव , राजू तिकोणे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त नितीन काळे, आरोग्य अधिकारी डॉ. सोनावणे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णवाहिका तसेच व्हेंटीलेटरची अतिशय कमतरता होती. तसेच खाजगी रुग्णवाहिकांचे चालक अवाढव्य रक्कम सांगून लुटालुटीचे प्रकार सुरु आहेत. खाजगी रुग्णवाहिकांच्या मालकांची मुजोरी पाहता तसेच रुग्णवाहिकांची वाढती मागणी लक्षात घेता माझ्या आमदार निधीतून सर्व सुविधांयुक्त अशा ३ रुग्णवाहिका वैद्यकीय सेवेकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. यापूर्वीही माझ्या आमदार निधीतून ३ रुग्णवाहिका महापालिका हॉस्पिटलसाठी देण्यात आल्या आहेत.  माझ्या मतदारसंघातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी हे माझे प्रथम कर्तव्य असून ५० लाख रुपये रुग्णवाहिकांसाठी तसेच ५० लाख रुपये व्हेंटीलेटरकरिता आमदार निधीतून देण्यात आले आहेत. लवकरच वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्हेंटीलेटरही उपलब्ध होणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

 457 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.