ऑनलाईन शिक्षणासाठी नेट पॅकचा देणार आधार

जागर” फाउंडेशनतर्फे गरीब-गरजू मुलांसाठी अनोखा उपक्रम

ठाणे : कोरोना संकटात आ.संजय केळकर यांच्या पुढाकाराने “जागर” फाउंडेशनतर्फे ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब-गरजू मुलांना नेट पॅक देण्याचा आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे क्रमप्राप्त झाले आहे. शाळांमधून त्या-त्या वर्गाचे गट करुन मोबाईलद्वारे शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत, शिक्षण देत आहेत. सध्याच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत, व्यवसाय बंद आहे. कष्टकरी समाजही आर्थिक विवंचनेत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांतील मुलांना पाठबळ मिळावे आणि शिक्षण घेण्याची प्रक्रिया अखंडित रहावी या हेतूने आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने जागर फाऊंडेशन या संस्थेने नेट पॅक देण्याची योजना सुरु केली आहे.
इयत्ता दहावीपर्यंतच्या पात्र गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांच्या शिफारस पत्रासह ‘जागर’ च्या प्रतिनिधीशी 8454090080 या क्रमांकावर संपर्क साधावा. ठाणे शहरातील गरजू विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुपमधील शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक शिफारस पत्राद्वारे द्यायचा आहे. त्यानुसार दर महिन्यास नेट पॅक थेट मोबाईलमध्ये टाकण्यात येणार आहे.
आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने संस्थेच्या ज्ञानजागर उपक्रमाच्या माध्यमातून आजवर शेकडो गरीब-गरजू विद्यार्थ्यांना वर्षंभर शालेय साहित्य आणि आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे थेट नेट पॅक योजना राबवण्यात येत आहे, अशी माहिती समन्वयक विनोद पितळे यांनी दिली आहे.
हा जागर आहे शिक्षणाचा आहे, हा जागर विद्यार्थी मित्र बनवण्याचा आहे, हा जागर कोरोनावर मात करण्याचा आहे. आपण सारे या ज्ञानजागरात सहभागी होऊ या, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे.

 334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.