ठाण्यात ‘भानुशाली’ दुर्घटना होण्याआधीच रहिवासी बचावले


खोपटच्या साई आनंद अपार्टमेंटला तडे, इमारतीमधील कुटुंबासह शेजारच्या चाळीतील कुटुंबाचे स्थलांतर


ठाणे : मुंबईच्या भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळून सहा जणांचा बळी गेल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच ठाण्यात केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. खोपट येथील तळ अधिक चार मजल्यांच्या २० वर्षे जुन्या साई आनंद अपार्टमेंटला तडे जाऊन इमारत झुकल्याचे गुरुवारी रात्री उशिरा लक्षात आले. ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने धाव घेऊन इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. या इमारतीला खेटून दोन चाळी असून रात्रीच्या गाढ झोपेत ही इमारत कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेने या चाळीतील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवले आहे. त्यामुळे ठाण्यात आणखीन एक भानुशालीची घटना होण्याआधीं राहिवासी बचावले.
उथळसर प्रभाग समितीमधील खोपट परिसरात साई आनंद अपार्टमेंट आहे. तळ अधिक चार मजल्यांच्या या २० वर्षे जुन्या इमारतीमध्ये सध्या आठ कुटुंबे वास्तव्याला आहेत. तर तळमजल्यावर तीन दुकाने आहेत. इमारतीच्या शेजारीच खेटून भोईर व साळुंखे चाळी आहेत. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास येथील रहिवाशांना इमारतीला मोठे तडे गेल्याचे निदर्शनास आले. तसेच इमारत एका बाजूला झुकल्यासारखी भासली. या परिस्थतीची सूचना ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच अग्निशमन दल व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी पथकांमार्पâत इमारतीमध्ये राहणाrऱ्या कुटुंबांना सर्वप्रथम बाहेर काढून इमारत सील केली. इमारतीचे बांधकाम धोकादायक स्थितीत असल्याने कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते हे लक्षात येताच शेजारील दोन्ही चाळींमधील नऊ रहिवाशांची घरे रिकामी करण्यात आली. या सर्व रहिवाशांचे जवळच असलेल्या पालिका शाळेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.

 432 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.